करमाळाकृषीसोलापूर जिल्हा

नीट नेटक्या नियोजनामुळे ढोकरीच्या शेतकऱ्याच्या केळीला उच्चांकी दर

करमाळा दि 29-

तालुक्यातील ढोकरी येथील केळी उत्पादक शेतकरी महादेव ज्ञानदेव बंडगर यानी आपल्या केळीला 29 रूपये 50 पैसे इतका राज्यातील उच्चांकी दर प्राप्त केला असून त्यांची केळी आखाती देशात इराण ला निर्यात होत आहे . राज्यातील या उच्चांकी दाराची सर्व दूर चर्चा आहे .

उजनी धरणामुळे पुनर्वसीत ढोकरी ता करमाळा येथील बंडगर वस्ती परिसरात गट नंबर 110 मधे करमाळा तालुका क्रषी उत्पन्न बाजार समिती करमाळा चे सभापती प्रा शिवाजी बंडगर यांचे बंधू महादेव बंडगर यानी पाच एकर क्षेत्रात केळीची लागवड केली असून त्यातील दोन एकरातील लागण ( सुरू ) कालपासून काढायला सुरू झाली. त्यातील पहिली गाडी इराण ला निर्यातीसाठी गेली आहे . याचा दर उच्चांकी 29 रूपये 50 पैसे प्रमाणे बंडगर यांना प्राप्त झाले.

महादेव बंडगर दहा बारा वर्षे पासून सतत केळी चे पीक घेतात. वांगी परिसरात अगदी सुरुवातीला केळी उत्पादण करणार्या शेतकर्या मधे त्यांची गणना होते. ते केळी पिकांचे संगोपण करताना लागणीचे टायमिंग, रोपे, लागवड पद्धत, खते, औषधे, पाणी, यांचं नीट नेटकं नियोजन करतात. त्यामुळे वांगी परिसरातील अनेक शेतकरी त्यांचा सल्ला घेतात.

तालुक्यातील शेटफळ येथील स्थानिक व्यापारी तुषार गुटाळ यानी सार्थक अॅग्रो, केरळ या केळी खरेदी कंपनी ला ही केळी दिली आहे . काल तुषार गुटाळ, कंपनी चे संचालक सनी इंगळे, व जी 5 या बेंगलोर येथील सह कंपनीचे शब्बीर केफी ,मरफील मेरूफ यानी बंडगर यांच्या प्लाॅट ला समक्ष भेट दिली. यावेळी महादेव बंडगर, वांगी सोसायटी चे उपाध्यक्ष भैरवनाथ बंडगर, यांनी त्यांचे स्वागत केले.बंडगर बंधू च्या या विक्रमी दराचे सर्वत्र कौतुक होत असून ढोकरी ग्रामस्थांनी या यशाबद्दल तोफा उडवून आनंद साजरा केला.

दहा बारा वर्षे पासून आम्ही केळी उत्पादीत करतो . परंतु इतका मोठा दर प्रथमच मिळाला असल्याने खूप आनंद आहे . रात्री अपरात्री अनंत अडचणींना तोंड देत कष्ट केले . उच्चांकी दर मिळाल्याने समाधान तर वाटतेच पण आत्मविश्वास दुणावला आहे.

– महादेव बंडगर, केळी उत्पादक शेतकरी, ढोकरी , तालुका करमाळा

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE