सामाजिकसोलापूर जिल्हा

ओबीसी आरक्षण संदर्भात समाजबांधवांची बैठक

करमाळा समाचार -संजय साखरे


ओबीसी समाजाचे पंचायत राजमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगरपंचायत, नगरपालिका महानगरपालिका मधील ओबीसी चे आरक्षण केंद्र व राज्य सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रद्द झाले आहे. हा ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मा.दशरथ आण्णा कांबळे व बाजार समिती सभापती बंडगर सर,दत्ता अडसूळ मा. उपसभापती कृ.उ.बाजार समिती यांच्या उपस्थित नियोजन मिटिंगचे आयोजन आज केतुर नं. 2 येथे विठ्ठल रुक्मिणी कार्यालयात करण्यात आले होते.

या वेळी दशरथ(आण्णा)कांबळे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा शिवाजी बंडगर, प्रा वाघमोडे सर,देवराव नवले,निलकंट अभंग यांनी मनोगत व्यक्त केले.सोमवारी दि १०/०१/२०२२ रोजी करमाळा येथे तहसील कचेरी वर ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने जमा होऊन निवेदन देण्याचे ठरले तसेच पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली. आभार आबा येडे यांनी मानले.

या वेळी माजी सभापती बापुसाहेब पाटील,सरपंच विलास कोकणे, अशोक पाटील,देवा नवले,लक्ष्मीकांत पाटील,महादेव नवले, दिगंबर नाझरकर,आबासाहेब ठोंबरे, नवनाथ राऊत, रामदास गुंडगिरे,संजय फडतरे,भिमराव येडे,रावसाहेब जरांडे , शंकर कानतोडे,यांच्या सह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE