लोकसहभागातून कुंभारगाव तलावात कुकडीचे पाणी
करमाळा संजय साखरे
करमाळा तालुक्यासाठी कुकडीचे पाणी तसे मृगजळच, कारण करमाळ्याच्या हक्काचे कुकडीचे पाणी श्रीगोंदे व कर्जत करांनी कधी करमाळा पर्यंत पुरेशा दाबाने येऊच दिले नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये जबाबदार लोकप्रतिनिधी व त्यासाठी पाठपुरावा करणारे गावातील प्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून कुकडीचे पाणी करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागाला मिळत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

असेच ऐन उन्हाळ्यात कुंभारगाव तालुका करमाळा येथील लोकांनी लोकप्रतिनिधी व कुकडी विभाग कोळवडी यांच्याकडे पाठपुरावा करून रीतसर मागणी अर्ज भरून व पाणीपट्टीच्या पावत्या फाडून कुकडीचे पाणी कुंभारगाव तलावात आणले आहे . उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या कुंभारगाव करांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून पिण्याच्या पाण्यासाठी होणारी त्यांची भटकंती आता थांबली आहे.
ऐन उन्हाळ्यात आम्हाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता आम्ही यासाठी आमदार संजय मामा शिंदे व कार्यकारी अभियंता कुकडी विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला. लोकसहभागातून जमा केलेल्या वर्गणीतून आम्ही पाणीपट्टी भरली आणि तलावात पाणी आले. मी लोकनियुक्त सरपंच झाल्यापासून दरवर्षी कुकडीचे पाणी तलावात आणत आह
–महेंद्र पानसरे -लोकनियुक्त सरपंच, कुंभारगाव ता करमाळा
