प्रतिभा घनवट यांचे निधन
करमाळा
भोसे येथील प्रगतशील बागायतदार शंकर घनवट यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभा घनवट(वय 47) यांचे काल दिनांक 23 रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. साडे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती सुरवसे सर यांच्या त्या धाकट्या भगिनी होत्या. सावडण्याचा विधी उद्या सकाळी आठ वाजता मौजे भोसे घनवट वस्ती येथे होईल. स्वभावाने अत्यंत मायाळू , श्रद्धाळू असल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
