पत्रकार नरसिंह चिवटे यांचा रविवारी पुण्यात सत्कार ; मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींच्या हस्ते वितरण
करमाळा समाचार

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा पत्रकार नरसिंह मनोहर चिवटे यांचा सत्कार पुणे येथील बालगंधर्व मंदिरात 11 जानेवारी 2026 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता होणार असून त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मातोश्री सरिता गंगाधरराव फडवणीस यांचाही आदर्श पालकत्व म्हणून सत्कार होणार आहे.

या सत्कारासाठी पद्मश्री गिरीश प्रभुणे उपस्थित राहणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मेधा कुलकर्णी, राजमाता जिजाऊ यांची वंशज रणजीत सिंह जाधव, सह्याद्री कन्या डॉ. शितल मालुसरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सन्मानचिन्ह देऊन शहाजी आदर्श पालक पुरस्कार श्री चिवटे यांना देण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात राहणाऱ्या सर्व करमाळ्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान पत्रकार संघाचे सचिव नासीर कबीर यांनी केले आहे.

