बंदी असलेल्या मांगुर मास्याची पैदास ; सोलापूर मत्सविभागाची कारवाई
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील टाकळी परिसरात उजनी जलाशयाच्या काठावर अवैधरित्या बंदी असलेल्या मांगुर (mangur) माशाची पैदास केली जात असल्याची माहिती मत्स्य विभागाला मिळाल्यानंतर या पैदास केंद्रावर मत्स्य विभागाच्या वतीने छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी पकडण्यात आलेल्या माशाला नष्ट करण्यात आले आहे. सदरची कारवाई सोलापूर येथील मत्स्य विभागाच्या वतीने करण्यात आली.

टाकळी तालुका करमाळा येथे उजनी जलाशयाच्या पात्रात पाच ते सात शेततळे घेण्यात आले आहेत. त्यामध्ये एका तलावात मांगुर माशाची पैदास केली जात असल्याची माहिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर सदरचे अधिकारी संबंधित ठिकाणी पोहोचले. यावेळी सदरचे मासे मिळून आले आहेत. त्यानंतर संपूर्ण मासा हा जमिनीत गाळून नष्ट करण्यात आला आहे.
