करमाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हाथरस येथील अत्याचार प्रकरणी निषेध
प्रतिनिधी सुनिल भोसले
हाथरस येथील दलित मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करमाळा तहसिल कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करून तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.

पुढे निवेदनात म्हटले आहे, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय वाल्मिकी समाजातील तरुण मुलीवर त्या गावातील उच्च जातीच्या तरुणाने सामाईक बलात्कार करून तिने आरोपीचे नाव न सांगण्याची हिम्मत करू नये म्हणून तिची जीभ छाटली गेली तीला वैद्यकीय उपचाराला झालेल्या अडथळ्यामुळे तिचे निधन झाले तिचे प्रेत घरच्यांना न देता पोलिसांनी परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
शेवटी तिच्या प्रेताचे अंतिम दर्शन पोलिसांनी घेऊ दिले नाही
या तरुणीला योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळू शकले नाही म्हणून तीचा जीव वाचू शकला नाही अशी क्रोध अमानुष अत्याचाराची घटना व संपूर्ण शासन व्यवस्थेने मदतीसाठी केलेले असहकार्य संपूर्ण देशाला व भारतीय व्यवस्थेला लज्जास्पद आहे म्हणून या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.

अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा तहसीलदार समीर माने यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी महिला आघाडीच्या शालन शिंदे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओव्होळ जिल्हा सचिव दास भोसले शहरध्यक्ष विशाल लोंढे अनिल कांबळे सायबा वाघमारे गेंदा आप्पा कांबळे शिवाजी भोसले सागर साळवे शिवाजी पोळ दत्तु कांबळे बाबासाहेब सरवदे ई कार्यकर्ते उपस्थित होते.