करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात करमाळ्यात एल्गार; २७ जुलैच्या सोलापूर मोर्चासाठी हजारो बांधव जाणार

करमाळा | प्रतिनिधी

अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात २७ जुलै रोजी सोलापूर येथे होणाऱ्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात नियोजन बैठक पार पडली. नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहाच्या आवारात ही बैठक आयोजित करण्यात आली.

सोलापूर येथील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मोर्चाचे नियोजन, करमाळा तालुक्यातून होणारा सहभाग आणि संघटनात्मक तयारी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील विविध भागांतील शेकडो कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थिती लावली.

बैठकीचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ यांनी केले. त्यानंतर लक्ष्मण भोसले, नितीन भोसले, नितीन दामोदरे, नंदू कांबळे, भीमराव कांबळे, सचिन अब्दुले आणि देवा लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले.
सोलापूरहून आलेले बबलू गायकवाड, आतिश (पॅंथर) बनसोडे, राजाभाऊ सोनकांबळे आणि प्रवीण कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ad

यावेळी नागेश कांबळे म्हणाले, “अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय असंवैधानिक असून, त्याविरोधात २७ जुलै रोजी सोलापूर येथे निघणाऱ्या भव्य मोर्चात करमाळा तालुक्यातून हजारो नागरिक व भीमसैनिक सहभागी होणार आहेत.”

बैठकीत बोलताना बबलू गायकवाड यांनीही आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडत, मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. बैठकीच्या शेवटी २७ जुलै रोजी सोलापूर येथे होणारा मोर्चा यशस्वी करण्यासाठी करमाळा तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE