मराठा भवन व वसतिगृहासाठी निधीची तरतूद करा -आ. रणजितसिंह मोहिते पाटील
करमाळा समाचार -संजय साखरे
कोपर्डीतील अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवन वस्तीग्रह बांधण्यासाठी दोन एकर शासकीय भूखंड व पाच कोटी रुपये बांधकामासाठी देण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार हा निधी तात्काळ उपलब्ध करून द्या अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत असा प्रस्ताव पाठवला होता, शासनाने तो मंजूर केला होता. परंतु कार्यवाही झाली नाही. पुनर्प्रस्ताव 2021 मध्ये पाठवला असला तरी त्यावरही अद्याप कार्यवाही झाली नाही. मराठा समाजाला आरक्षण देणारे सरकार म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहेत. तरी मराठा समाजाच्या या न्याय मागणीचा विचार करून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. असे त्यांनी म्हटले आहे.