करमाळ्याच्या कमालाई मातेवर आधारीत गाण्याचे मंदीर परिसरात प्रकाशन ; प्रकाशनाचा मान महिलांचा
करमाळा समाचार
करमाळ्याच्या कमलाभवानी मंदिरात पोथरे येथील पोलीस पाटील संदीप पाटील यांनी लिहून संगीत तसेच गायन केलेले गीत “करमाळ्याची कमलाई माता” हे गाणे आज मंदिर परिसरात प्रदर्शित करण्यात आले. सदर चे गाणे ही नवरात्रीनिमित्त नारी शक्तीचा सन्मान म्हणून महिलांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. यावेळी अंजली श्रीवास्तव व इतर महिलांच्या हस्ते प्रकाशन पार पडले.


करमाळ्याची कमलाई ही राज्यभर सर्वत्र परिचित आहे. अतिशय प्रसिद्ध असे हे मंदिर अनेक कारणांनी प्रकाशझोतात आलेले आहे. या ठिकाणी अनेकदा सिनेमे चित्रित झाले छोटे-मोठे गाणे चित्रित झाले. परंतु कमलाभवानी मातेवर आधारित गाण्यांची संख्या फारच कमी आहे. गाण्यांच्या माध्यमातून कमलाई माता घरोघरी पोहचावी विविध ठिकाणी गाण्याच्या माध्यमातून सर्वांच्या ओठावर देवीचे नाव असावे याच भावनेतून आता संदीप पाटील यांनी हे गीत सर्वांच्या समोर आणले आहे.
सदर गीताला संगीत संदीप पाटील यांनीच दिले आहे. तर सह गायक कृष्णा जाधव, यांच्यासह रिदम तौफिक पठाण, अशोक गवळी व विजय जाधव यांनी काम पाहिले. या गाण्याचे प्रकाशनावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक मिठु जगदाळे, हवालदार संतोष देवकर, डॉ.अंजली श्रीवास्तव, शोभा अभिमन्यू पाटील, गवारे ताई, माया कृष्णा जाधव, मंजुषा किशोरकुमार शिंदे, मितवा श्रीवास्तव, निता रंजित शिंदे, योगिता संदिप शिंदे-पाटील पत्रकार किशोरकुमार शिंदे(सर), पत्रकार विशाल (नाना)घोलप, भूषण अभिमन्यू पाटील, मनोज जमादार पाटील, धीरज शिंदे, संघमित्रा, किरण आदि उपस्थित होते.
*”करमाळ्याची कमलाई माता”* गाणे सध्या होतेय व्हायरल ; महिलांच्या हस्ते झाले उद्घाटन