दिलासादायक बातमी बाधीतांचा आकडा सहाशेपार पण बरे होणारे 400 हुन जास्त
करमाळा समाचार –
करमाळा तालुक्यात नव्याने 13 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये शहरात सहा तर ग्रामीण भागातून सात बाधीतांचा समावेश आहे. आज एकूण 65 टेस्ट घेण्यात आल्या. तसेच सहा बाधितांना उपचार पूर्ण करून घरी सोडण्यात आल्याने त्यांचा आकडा चारशेवर जाऊन पोचला आहे. तर उपचार 199 लोकांवर सुरू आहेत. एकूण 612 बाधित आजपर्यंत करमाळा तालुक्यात आढळून आले आहेत.

ग्रामीण
वीट – 1
हिसरे – 1
लव्हे – 2
बिटरगाव – 3

शहर –
दगडीरोड – 2
शाहुनगर – 1
दत्तपेठ – 2
सावंतगल्ली – 1