केलेल्या कामाची सत्कारातुन उतराई ; करमाळ्यात मनसे पदाधिकाऱ्यांचा सत्कार
करमाळा समाचार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, करमाळा तालुका व शहर च्या वतीने दि. 6/11/2020 शुक्रवार रोजी करमाळा तालुक्यातील सर्व बॅन्ड व्यावसायिकांना शुभकार्ये कार्यक्रम करण्याची महाराष्ट्र सरकार कडुन परवानगी मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले होते तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने मा. राज ठाकरे यांच्या आदेशावरून जे महाराष्ट्रात आंदोलन कले यांची राज्य सरकार कडुन दखल घेऊन परवानगी देण्यात आली. त्यामुळे करमाळा तालुका व शहर च्या बॅन्ड व्यावसायिक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना,करमाळा तालुका व शहर ची टिम यांचा आनंदाने स्वागत करून सत्कार केला.

यावेळी मनसे करमाळा तालुका अध्यक्ष मा.संजय( बापु )घोलप, जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, ता.उपाध्यक्ष अशोक गोफणे वि.सेना मनसे मा.सतिश फंड, मा.रोहित फुटाणे, मा.आनंद मोरे, सचिन कणसे, अमोल जांभळे सर्व करमाळा मनसे पदाधिकारी यांचे करमाळा बॅन्ड व्यावसायिकांनी आभार मानले.

असेच आमचे प्रश्न भविष्यात पण सोडवावे अशी आशा व्यक्त केली. यावेळी बॅन्ड मास्टर अलिमभई पठाण, मुक्तार पठाण, ईसाक पठाण, जावेद पठाण, मुलखान पठाण, मस्तान करेशी,महम्मद हसीफ कुरेशी,बबलु शेख,हमीद पठाण, युवराज जगताप, अलीम कुरेशी,भाऊसाहेब ठोसर,नासीर कुरेशी,मुन्ना पठाण, भैय्या पठाण, सैफन कुरेशी ,अजीम पठाण व सह कलाकार उपस्थित होते.