बाळुमामाचे मंदीर उभारणाऱ्या उंदरगावच्या मनोहर मामांचा खुलासा
करमाळा समाचार
आपण बाळूमामाचे वंशज किंवा अवतार नसल्याचा खुलासा स्वतः उंदरगाव येथील मनोहर भोसले यांनी केला आहे. नुकतेच त्यांच्यावर वंशज असल्याचे फसवणूक करून पैसे लाटत असल्याचे आरोप झाले होते. याला उत्तर देताना भोसले यांनी आपण फक्त भक्त असल्याचे जाहीर केले आहे.

यासंदर्भात बोलताना भोसले म्हणाले, कलर्स मराठी या चैनल वर बाळुमामाची कीर्ती घरोघरी पोहोचली आहे. त्यामुळे अनेकांना आपण वंशज असल्याची गैरसमज झाल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय काही प्रसिद्धी माध्यमात जर आपण कुठे बाळूमामाचे वंशज असल्याचे बोललो असेल किंवा दाखवले असेल तर त्यांनी ते दुरुस्त करून घ्यावे अशा सूचनाही यावेळी मनोहर भोसले यांनी दिले आहेत.

सर बाळुमामाच्या नावाखाली कोणाचेही फसवणूक होत नसून उंदरगाव येथे भव्य मंदिर उभे राहत असून भक्तनिवास बांधण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी उंदरगाव संस्थान व शिवसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हे काम केले जात आहे. बाळुमामाच्या नावाखाली कोणाकडूनही पैसे मागितले जात नसल्याचा खुलासा यावेळी मनोहर भोसले यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी आदमापुर या ग्रामपंचायतीने ठराव पास करून संबंधित मनोहर भोसले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली होती. तर आता स्वतः भोसले यांनी खुलासा केल्यानंतर आदमापुर ग्रामपंचायत व बाळुमामाचे भक्त नेमकी कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.