करमाळ्यातील बागल शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सतीश कांबळे, विकास काळे व्हाईस चेअरमन
करमाळा समाचार
येथील लोकनेते स्व. दिगंबरराव बागल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन चेअरमन पदी सतीश कांबळे व व्हाईस चेअरमन पदी विकास काळे तर सचिवपदी संतोष पोतदार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोधपणे पार पडली. त्यामध्ये कांबळे, काळे, पोतदार यांच्यासह नानासाहेब मोहीते, अशोक बरडे, सुहास कांबळे, शिवाजी लोकरे, धनंजय दिरंगे, जहाँगीर सय्यद, सुवर्णा महामुनी, श्रीमती जयश्री माने यांचा समावेश आहे.

संचालक मंडळ निवडीनंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवड सर्वानुमते पार पडली. यावेळी कांबळे यांची चेअरमन तर काळे यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाली. निवडीनंतर बोलताना पतसंस्थेचा कारभार करताना सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. असे कांबळे यांनी सांगितले. निवडीनंतर नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सन्मान करण्यात आला. पोतदार यांनी आभार मानले.