आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची छाननी पुर्ण ; तीन अपत्य असलेल्या एकाच्या अर्जासह पाच अर्ज अवैध
करमाळा समाचार अमोल जांभळे
तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आज अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आठ ग्रामपंचायत मधून एकूण ७२ जागांसाठी ३१६ अर्ज दाखल झाले आहेत. तर या अर्जांची छाननी आज पूर्ण झाली त्यामध्ये पाच जणांचे अर्ज अवैध दाखल झाले आहेत त्यापैकी चार जणांचे दुसरे अर्ज असल्याने एक अवैध ठरवला आहे. तर एकाचा तीन अपत्ये असल्यामुळे अर्ज पूर्ण बाद करण्यात आला आहे.

तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर त्याची नव्याने निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यामध्ये वांगी क्रमांक एक, वांगी क्रमांक दोन, वांगी क्रमांक तीन, वांगी क्रमांक चार, वडशिवणे, आवाटी, सातोली व बिटरगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे.

*खराब रस्त्याचा फटका बसल्याने टॅकर मधील सात हजार लीटर पाणी वाया*
खराब रस्त्याचा फटका बसल्याने टॅकर मधील सात हजार लीटर पाणी वाया
वांगी क्रमांक एक मध्ये ११ जागांसाठी ६० अर्ज, वांगी क्रमांक दोन येथे ९ जागांसाठी ४४ अर्ज, वांगी क्रमांक तीन येथे ९ जागांसाठी २९ अर्ज, वांगी क्रमांक चार येथे ९ जागांसाठी ३६, वडशिवणे येथे ९ जागांसाठी ३२ अर्ज, आवाटी येथे ९ जागांसाठी ५१ अर्ज, सातोली येथे ७ जागांसाठी २२ अर्ज, तर बिटरगाव येथे ९ जागांसाठी ३६ अर्ज शिल्ल्क आहे. उद्या पासुन माघार घेण्यास सुरुवात होईल माघार घेतल्या नंतर पुढील चित्र स्पष्ट होईल.
अवैध ठरवलेले अर्ज पुढील प्रमाणे –
१) दशरथ चव्हाण (तीन अपत्ये) वांगी क्रमांक तीन वार्ड दोन
बाकीच्या वांगी २ याठिकाणी १ व तीन प्रभागातील प्रत्येकी एक व आवाटीत प्रभाग एक मधील – एक आणी बिटरगाव प्रभाग दोन मधील – एक असे चार अर्ज दोन असल्याने एक वैध व एक अवैध ठरवले आहेत.