गुरुकुलच्या दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय पोखरापुर येथे निवड
करमाळा समाचार
गुणवत्ता गुरुकुल ची गुरुकुल पब्लिक स्कूल ने जेव्हापासून इयत्ता पाचवीचा वर्ग चालू केला आहे, तेव्हापासूनची परंपरा अविरत चालू ठेवून चालू शैक्षणिक वर्षात आदिराज घाडगे सालसे व शरयु बिरंगल करमाळा या दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय पोखरापूर या ठिकाणी निवड झाली आहे.

स्पर्धा परीक्षांमध्ये ओळखणारी शाळा म्हणजे गुरुकुल आज हे पुन्हा सिद्ध झाले. विद्यार्थ्यांना कोणतेही तास न लावता शाळेने कोल्हापूर, सातारा, लातूर या ठिकाणच्या प्रश्नपत्रिका मागून मुलांचा सराव घेऊन वरील संपादन केले. वर्गशिक्षिका नायकोडे मॅडम यांचे अभिनंदन संस्थेचे सर्व सर्वे नितीन भोगे व रेश्मा भोगे यांनी केले.
