जेष्ठ नेते पवारांनी घेतली वारे यांच्या पत्राची दखल ; भाषणातुन दिले गडकरींनी आश्वासन
करमाळा समाचार
अहमदनगर येथे रस्त्याच्या भूमिपूजनाचा निमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे उपस्थित होते. यावेळी टेंभुर्णी अहमदनगर रस्त्याची झालेली दुरावस्था त्यांच्या समोर मांडून सदरचे काम केंद्र सरकारकडे (NHI) हस्तांतरित करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारे यांनी केली. यावेळी पवार यांच्यासह गडकरी यांनीही तात्काळ दखल घेत आश्वासन दिले आहे.

*शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; उद्या पासुन या गावचा आठवडा बाजार सुरु*
https://karmalasamachar.com/good-news-for-farmers-the-villages-weekly-market-starts-from-tomorrow/

अनेक वर्षांपासून अहमदनगर टेंभुर्णी महामार्गाचे काम रखडले असून पूर्वीच्या ठेकेदाराने काम अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे जवळपास चारशे ते पाचशे अपघात या रस्त्यावर झालेल्या आहेत. तात्पुरत्या स्वरूपाची याची डागडुजी होते. परंतु परत आहेत तीच गत त्या रस्त्याची होत असल्याने अपघातांवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे.
केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत अहमदनगर टेंभुर्णी या मार्गाचा समावेश हा केंद्र सरकारने भारतमाला योजनेत केला आहे. परंतु अद्याप हा रस्ता केंद्राच्या तयारीत आलेला नाही. त्यामुळे तात्काळ केंद्राकडे (NHI) हा रस्ता वर्ग करावा अशी मागणी वारे यांनी यावेळी पक्षाचे नेते पवार यांच्याकडे केली. पवार यांनीही तात्काळ दखल घेत पुढील कारवाईसाठी थेट नितीन गडकरी यांच्याकडेच ते पत्र दिले. गडकरी यांनीही सदर कारवाईचे आश्वासन दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारे यांनी दिली आहे. तर सदर कामासाठी आ. संजयमामा शिंदे यांनीही पाठपुरावा केल्याचेही त्यांनी सांगितले.
*हॉटेल धनश्री जवळ हा प्रकार घडला आहे संपूर्ण ट्रक भर रस्त्यात पेटला* https://youtu.be/GIgG5BNw_-U
अहमदनगर टेंभुर्णी या रस्त्यावरून विठ्ठलाच्या दर्शनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक वारकरी जात असतात. त्यामुळे सदर चा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी आमदार निलेश लंके यांनीही पुढाकार घेतल्याचे दिसून आले. सदरच्या कार्यक्रमाला लंके यांच्यासह आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते.