शिवसेनेची शहराची नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर करणार – संजय शिंदे
करमाळा
करमाळा शहर प्रमुख म्हणून निवड झालेले संजय शिंदे (नेते) यांनी करमाळा शहराचे नूतन पदाधिकारी म्हणून लवकरच निवडी करण्याबाबतीत निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. तर प्रत्येक वार्डात शाखा प्रमुख यांचीही नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

करमाळा नगरपरिषद संदर्भात (उद्धव ठाकरे) यांच्या शिवसेना मार्फत 17 वार्ड मध्ये निवडणूक तयारीसाठी बैठक घेऊन व नूतन शहर कार्यालय यांचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे. मा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे आचार विचार सर्व सामान्य कार्यकर्ते यांच्या पर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे ही सांगितले. आगामी येणाऱ्या निवडणुकीची तयारी या संदर्भात तालुक्यातील पदाधिकारी सोबत एक बैठक घेऊन तालुका प्रमुख व युवा सेनेचे तालुक्यातील पदाधिकारी याच्या सोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.