शिवमची चमकदार कामगिरी देशात मिळवला आठवा क्रमांक ; शिवम मुळचा करमाळा तालुक्यातला
करमाळा प्रतिनिधी
शिलॉंग येथे झालेल्या नॅशनल रँकिंग आर्चरी स्पर्धेत एकलव्य अकॅडमी मोडनिंबचा तिरंदाज व मूळचा करमाळा तालुक्यातील रायगाव चा रहिवासी असलेला शिवम राजेंद्र चिखले याने पहिल्या दिवशी 318 आणि 322 स्कोर प्राप्त करून राष्ट्रीय रँकिंग स्पर्धेत पहिल्या दिवशी आठव्या स्थान निश्चित केले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी इलिमेशन मध्ये शिवम राजेंद्र चिखले याने राजस्थान गुजरात दिल्ली अशा तिरंदाज यांना पराभूत करून त्याने एलेमेशन राउंड मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले असे सुवर्णपदक प्राप्त करणारा हा सोलापूर जिल्ह्यातील एकमेव तिरंदाज आहे. तो सध्या एकलव्य अकॅडमी मोडनिंब विठ्ठल भालेराव सर यांच्या अकॅडमीमध्ये सराव करत आहे. आणि तो सध्या शांतिनिकेतन विद्यामंदिर मोडनिंब या ठिकाणी इयत्ता नववी मध्ये शिकत आहे.
इतक्या लहान वयात त्याने नॅशनल आर्चरी टूर्नामेंट मध्ये आपले सुवर्णपदक प्राप्त केले. त्याबद्दल त्याला यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक यांच्या अभिनंदन भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोदजी चांदोरकर सर, महाराष्ट्र धनु उद्या संघटनेचे उपाध्यक्ष हरिदास रणदिवे सर, महाराष्ट्र संघटनेच्या सहसचिव सोनल बुंदिले मॅडम, कोषाध्यक्ष रंगराव साळुंखे सर, भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक अभिजीत दळवी सर, भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक प्रवीण सावंत सर यांनी त्याचे अभिनंदन केले.

याबाबत त्याचे वडील राजेंद्र चिखले बोलताना म्हणाले की, लहानपणापासूनच त्याला तिरंदाज खेळाची अवघड आवड होती. आजचा त्याचा परफॉर्मन्स पाहता तो भावी काळात नक्की ऑलिंपिक मध्ये भारताचे नेतृत्व करेल असा मला विश्वास आहे.