करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा आगारात कर्मचाऱ्यांसह गाड्यांचा तुटवडा ; शासन दरबारी ताकद पडतेय अपुरी

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात एस टी महामंडाळाच्या ताफ्यात केवळ ५८ गाड्या आहेत अजुनही तब्बल २५ ते ३० गाड्यांची कमतरता असल्यामुळे नियोजन करताना अधिकाऱ्यांची दमछाक होतेच. शिवाय नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेल्या प्रवास पास च्या तुलनेत बस कमी पाठवल्या जात असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत होती. त्याच्या तक्रारी आल्यानंतर सदर गाड्या सुरू झाल्या. मात्र आता लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असल्याने प्रवाशांना अडचणी उद्भवू लागल्या आहेत. सोलापूर जिल्ह्या बाहेरील तालुक्यात गाड्यांची अवस्था नक्कीच चांगली आहे. आपल्या भागातील नेत्यांचा रेटा कमी पडतोय का ? असा प्रश्न उपस्थित होतोय.

मागील दहा वर्षात करमाळा आगारात केवळ चार नव्या गाड्या आल्याची नोंद आहे तर बाकी गाड्या दहा वर्षांपुढील असल्याने जुन्या व खराब झाल्याचे चित्र आहे त्यामुळे बऱ्याचदा प्रवासादरम्यान व माघारी आल्यानंतर त्याची करणे गरजेची व नित्याचीच झाली आहे त्यामुळे करमाळा आगारात नव्या गाड्यांची मागणी जोर धरत असली तरी राजकीय रेटा कमी पडत असल्याने तितकेसे वजन करमाळा तालुक्याचे पडत नसल्याचे दिसून येते

तालुक्यातील विद्यालयात जाण्यासाठी व ग्रामीण भागातून शहरी भागात येण्यासाठी एसटी महामंडळाकडे एकूण 1980 एसटी पासची नोंद आहे सोगाव येथील विद्यार्थ्यांना करमाळ्याकडे येण्याची सोय झाली होती पण माघारी जाण्यासाठी गाडी उपलब्ध नव्हती तर वीट विहार कोर्टी परिसरातील विद्यार्थ्यांनाही विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कमी बस असल्यामुळे एकाच बसमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कोंबले जात होते तरीही इतर विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागत असे याच्या तक्रारी वाढल्यानंतर आगार व्यवस्थापक यांनी सदरच्या विद्यार्थ्यांची अडचण दूर करीत गाड्या सुरू केल्या मात्र यासाठी इतर गाड्या बंद कराव्या लागल्या आहेत यामुळे लांब पल्ल्याची गाड्या बंद झाल्याने महामंडळासह इतर प्रवाशांचंही नुकसान होताना दिसत आहे या सर्व पर्यायातून मार्ग काढण्यासाठी बस वाढवणे गरजेचे आहे

चालक व वाहकांच्या संख्येत मोठी तफावत …

करमाळ्यातून बारामती मार्गे सातारा व अकलूज मार्गे सातारा, संभाजीनगर, कोल्हापूर, भगवानगड, तुळजापूर, टेंभुर्णी शटल व जामखेड शटल या गाड्यांची संख्या कमी झाल्याने महामंडळाला तोटाही सहन करावा लागत आहे व प्रवाशांनाही जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाने वृद्धांना मोफत तर महिलांना हाफ तिकीट केल्यापासून महामंडळाकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. परंतु बस उपलब्ध नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय सध्याच्या परिस्थितीत १३५ चालक व ९७ वाहक असल्याने मुळातच कर्मचाऱ्यांमध्ये व बसच्या संख्येत तफावत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE