शिष्यवृत्ती परीक्षेत श्री राजेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश
करमाळा समाचार – संजय साखरे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राजुरी येथील श्री वैजिनाथ स्वामी सेवा मंडळ संचलित श्री राजेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या परीक्षेत विद्यालयातील इयत्ता पाचवी चे विद्यार्थी ओंकार अमोल दुरंदे 80.53, नितीन राजे रेवननाथ साखरे 80.53, निळकंठ मारुती साखरे 75.83, आदित्य नानासाहेब साखरे 73.82, आणि अक्षता बिबीशन साखरे 73.15 हे विद्यार्थी प्रथम श्रेणीत पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
यासाठी त्यांना पाचवीचे वर्गशिक्षक श्री अवघडे सर व मुख्याध्यापक श्री झोळ सर यांचे मार्गदर्शन लाभले. या विषयाबद्दल त्यांचे श्री राजेश्वर विद्यालय राजुरी व समस्त राजुरी ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.
