श्री आदिनाथ कारखान्याची वाटचाल खाजगीकरणाकडे ; बचाव समीतीच्या भुमीकेकडे लक्ष
करमाळा समाचार –
तालुक्याचा राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही. खाजगी होण्यापासून वाचल्यानंतर आता पुन्हा त्याच्यावर प्रशासन नेमले आहे. तर प्रशासक व्हाया खाजगी मंडळ त्याच्यावर नेमण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. त्या दृष्टीने सध्या पावले उचलली जात असण्याची शक्यता आहे अशा चर्चा सध्या तालुक्यात जोर धरत आहेत.

मागील वर्षभराच्या काळात मोठ्या प्रमाणावर बदल होत कारखाना सुरुवातीला आ. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला देण्याचे जवळपास निश्चित झालेल्या असताना आदिनाथ बचाव समितीने त्यात लक्ष घातले. जो कारखाना खाजगी होणार होता त्याला विरोध करत बचाव समीती, संचालक मंडळ व माजी आमदार नारायण पाटील यांनी पुन्हा एकदा कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यात यश मिळवले होते. त्यानंतर कारखानावर संपूर्ण यंत्रणा दुरुस्त करून कार्यारित झाला मागील हंगाम कारखान्यांनी पूर्णही केला.
कारखान्याचा कार्यकाल पूर्वीच संपलेला असून याची निवडणूक अपेक्षित असताना अद्यापही निवडणूक लागलेली नाही. तर निवडणुकीसाठी अपेक्षित रक्कम भरणे संचालक मंडळाला शक्य झाले नाही असा दावा साखर संचालक यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच संबंधित कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आले आहे. प्रशासकाच्या आडून आता यावर पुन्हा काही खाजगी लोक सदर कारखाना चालवण्यासाठी येऊ शकतात अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत. तर असे झाल्यास पुन्हा हा कारखाना अधिकृतरित्या खाजगी लोकांच्या तावडीत जाईल व पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता मावळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यापेक्षा यावर प्रशासकाच्या माध्यमातून निवडणुका घ्यायला पाहिजेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. पूर्वी भाडेतत्त्वावर देण्यासाठी सुरू असताना त्याला बचाव समितीने विरोध केला होता. पण आता तर कोणत्याही भाड्याशिवाय सदर संचालक मंडळ नेमले जाऊ शकत. मग बाजार समितीचा भूमिका काय राहील याकडे लक्ष लागून आहे.

प्रशासक मंडळ नेमणे शासनाला अधिकार … दराडे
मागील वर्षी कारखान्याची मदत संपलेली आहे. त्यामुळे त्यावर निवडणूक घेणे अपेक्षित होते. जिल्ह्यातील इतर कारखान्यांची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण आदिनाथची रक्कम न आल्याने त्यावर प्रशासक नेमला आहे. इतर मंडळ नेमण्याचा अधिकार शासनाला असून त्याबाबत शासन निर्णय घेईल. अद्याप आमच्यापर्यंत असा कोणताही सूचना आलेल्या नाहीत.
– आर. दराडे,
सहकारी साखर संचालक.
प्रशासकाच्या आडुन आदिनाथ गिळकृत करण्याचा प्रयत्न – गुळवे
श्री आदिनाथ सहकारी कारखान्यावर काहीजणांचा आधिपासुनच डोळा असुन अदिनाथ पुन्हा एकदा अडचणीत आणुन सरकारच्या माध्यमातून स्वतःचे संचालक मंडळ त्यावर नेमुन पुन्हा एकदा कारखाना प्रशासनाच्या आडुन अप्रत्यक्षपणे कारखाना गिळंकृत करण्याचा प्रयत्न आहे.
– सुभाष गुळवे,
उपाध्यक्ष बारामती ॲग्रो.