करमाळासोलापूर जिल्हा

श्री संजय सरवदे यांना अहिल्या भक्त पुरस्कार जाहीर

अमोल जांभळे – प्रतिनिधी


घारगाव येथील राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक श्री संजय दगडू सरवदे यांना पुण्यश्लोक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य नायगाव (नाशिक) या संस्थेच्या वतीने दिला जाणारा अहिल्या भक्त पुरस्कार जाहीर झाला आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाऊसाहेब रमेश ओहळ यांनी कळविले आहे.

पुण्यश्लोक बहुउद्देशीय संस्था रजिस्टर संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील समाज दूतांना सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक कला क्रीडा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव योगदान देणाऱ्या समाजदुतांना अहिल्याभक्त पुरस्कार दिला जातो. सन 2021 व 2022 यावर्षीचा अहिल्या भक्त पुरस्कार सरवदे यांना जाहीर झाला.

सरवदे यांनी राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षारोपण, शाळा सुशोभीकरण, डोळे तपासणी शिबिर, विद्यार्थ्यांसाठी मास्क वाटप आदी सामाजिक कामे केली आहेत. याची दखल घेत पुण्यश्लोक बहुउद्देशीय संस्था नायगाव नाशिक हा या संस्थेने संजय सरवदे यांना अहिल्या भक्त पुरस्कार जाहीर केला आहे.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE