… तर अब की बार ट्रप सरकार म्हणायला तिकडे का गेला होता ? ; तेंडुलकरला सरकारने ट्वीट करायला लावले – राज ठाकरे
करमाळा समाचार
शेतकरी धोरणाबाबत हा आपला मुद्दा आहे बाहेरच्यांनी बोलु नये असे वाटत आहे. तर अमेरिकेत कशाला अब की बार ट्रम सरकार म्हणायला गेले होते ? असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. पुढे म्हणाले की मंगेशकर तसेच तेंडुलकर यांना आपल्या फायद्यासाठी काहीही ट्वीट करायला लावून त्यांना यात ओढणे ही सरकारची चुकीची भूमिका आहे त्यांनी असं करायला नव्हतं पाहिजे.

सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन वरून राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कृषी कायदा चांगला आहे. पण त्यात काही त्रुटी असू शकतात त्या त्रुटी केंद्राने राज्य सरकारांसोबत बसून मिटवला पाहीजे. त्यातून तोडगा काढला पाहिजे उगाचच विषय ताणला जाऊ नये. याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे होती. भारतरत्न सारख्या मोठ्या लोकांना काहीतरी ट्विट करायला सांगायचं आणि त्यांच्यासह सगळ्यांचीच बदनामी करून टाकायची ही पद्धत चुकीची आहे.

तर औरंगाबाद चा नामकरणावरून ठाकरे म्हणाले की, मागील वेळी भाजपा केंद्रात तसेच राज्यातही सत्तेत होती. मग त्यावेळी का नामकरण केले नाही. आताच का निवडणुका जवळ आल्या की तुम्हाला नामांतराचा प्रश्न पडला आहे असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपा तसेच शिवसेना नेत्यांना विचारला आहे. तसेच लोकांना वेडे समजू नका असाही सल्ला दिला आहे.
तर केंद्र व राज्य सरकारांनी बसून कृषी धोरणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असून सामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे. आंदोलन जास्त चिघळवत बसू नये. तर प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्र्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढावा. देशभरातून बोलले जात आहे की कायदा हा सर्वसमावेशक असावा मोजक्या लोकांच्या फायद्याचा नसावा ते योग्यच आहे असेही ठाकरे यांनी सांगितले.