करमाळ्यात दिवंगत नेत्यांचे फोटो असलेल्या डिजिटल बोर्ड ची समाजकटंकाकडुन विटंबना
करमाळा समाचार
अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाचे सोलापुर जिल्हाध्यक्ष श्री.डाॕ.धवलसिंह मोहीते पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी संदर्भात दिं.०६/०३/२०२२ रोजी कार्यक्रम संपन्न होणार आहे.त्याच्या जाहिरीतीसाठी करमाळा शहरामध्ये करमाळा शहरामध्ये करमाळा नगरपालिकेची रितसर परवानगी घेऊन आम्ही डिजिटल फलक लावले आहेत. त्या डिजिटलवर दिवंगत नेते व राष्ट्रीय नेत्यांचे फोटो असुन सदर डिजिटल पोथरनाका, भवानीपेठ, रंभापुरा व एस टी स्टँड समोर ऊभा केले आहेत.

परंतु पोथरनाका परिसरातील डिजिटलची नपुंसक व समाजकंटक प्रवृत्तीच्या लोकांकडून विटंबना झालेली आहे. याच परिसरामध्ये देशभक्त व स्वातंत्र्य सैनिक स्व.नामदेवरावजी जगतापसाहेब यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याचीही समाजकंटकाकडुन विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी आपल्या विभागाकडुन सदर भागामध्ये रात्रीचा पोलिस बंदोबस्त व गस्त वाढवावी किंवा आमच्या कार्यकर्त्यांना गस्त घालण्याची परवानगी द्यावी. अशावेळी असे कृत्य करणारे समाजकंटक व आमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होवुन अनुचित प्रकार घडु शकतो मग अशावेळी त्याची सर्वस्वी जबाबदारी कोणावर..?

तरी वरील सर्व गोष्टींचा गांभिर्याने विचार करुन कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणार नाहीत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये यासाठी पोथर नाका व परिसरामध्ये आपल्या खात्या मार्फत रात्रीच्यावेळी बंदोबस्त व गस्त मध्ये वाढ करुन कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु नये याची काळजी घ्यावी हि विनंती केली आहे.