करमाळासोलापूर जिल्हा

स्व . गिरधरदास देवी यांच्या जयंती निमित्त अनोखा उपक्रम ; जयती दिवशी लोकार्पण

करमाळा समाचार 

करमाळा भूषण स्व. गिरिधरदास देवी यांच्या 11 मार्च जयंतीनिमित्त करमाळा शहरातील जनतेच्या सुरक्षेसाठी शहराच्या वाहतुकीच्या मार्गावर 30 सुरक्षा आरसे  बसवण्यात येणार आहे. याचा लोकार्पण सोहळा जयंती दिवशी आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे अशी माहिती स्व. गिरधरदास देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक कन्हैयालाल देवी यांनी दिली आहे.

सदरचे आरसे बसवल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या गाड्या या आरशात स्पष्टपणे दिसणार असल्याने अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल. शहरात शाळेकडे तसेच चौकात लहान मुले तसेच वयोवृध्द हे रस्ता ओलांडताना अनेकदा छोटे मोठे अपघात घडलेले आहे. या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी सदरचे आरसे महत्त्वपूर्ण ठरतील. याचाच विचार करून देवी प्रतिष्ठानच्या वतीने सदर मोहीम राबवण्यात येणार आहे.

या आरशांचा लोकार्पण सोहळा लवकरच होणार आहे. सदरचे आरसे संगम चौक ,सुभाष चौक, जय महाराष्ट्र ,फुलसौदर , पोथरे नाका, किल्ला वेस , छत्रपती शिवाजी महाराज चौक, गायकवाड चौक , रंभापुरा पुणे रोड, महात्मा गांधी शाळा चौक, गायकवाड चौक. रंभापुरा, पुणे रोड अशा ठिकाणी लावण्यात येणार आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE