सोशल मिडिया ओळखीतुन अत्याचार ; गुन्हा दाखल झाल्यावर १९ महिन्यांनी जामीन
करमाळा समाचार
आरोपीला इंस्टाग्राम ,व्हाट्सअप, फेसबुक ची ओळख पडली महागात 604 दिवसानंतर (19महिने 15 दिवस) दिवसानंतर बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत प्रकरणातून मा. मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असल्याची माहीती संशयीताचे वकील अमर शिंगाडे यांनी दिली आहे. सलीम सगरी रा. उस्मानाबाद असे संशयीताचे नाव आहे.
सदर प्रकरणाची हकीगत अशी की आरोपीची इंस्टाग्राम,फेसबुक तसेच व्हाट्सअप ह्या मोबाईल ॲपद्वारे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुलाशी ओळख झाली या ओळखीचे रूपांतर गुन्हा घडण्यामध्ये झाले मुलगा सदर मुलीला भेटण्याकरिता उस्मानाबाद जिल्ह्यातून करमाळातालुका या ठिकाणी भेटण्याकरिता आला भेटल्यानंतर आरोपींने अल्पवयीन मुलीवरती दोन मित्राच्या सहाय्याने तिच्यावर लॉज येथे अतिप्रसंग केला असा आरोप संशित आरोपी वरती करमाळा पोलीस स्टेशन येथे आयपीसी कलम 376,354,354(A),323,504, 506,34 तसेच पोस्को कलम 4,6,8,12,17 कायद्या अंतर्गत 10 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल झाला होता.
आरोपीचा मा.जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी येथील जामीन फेटाळल्यानंतर आरोपींन मुंबई उच्च न्यायालय येथे जामीनकरिता धाव घेतली. आरोपीच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालय समोर युक्तिवाद केला आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. उच्च न्यायालयाने आरोपीस शेर्ती व अटी तसेच 30 हजाराच्या जामीनावरती जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने एडवोकेट भाग्यश्री मांगले- शिंगाडे व अमर शिंगाडे यांनी काम पाहिले.