चुरशीच्या सामन्यात सोलापूर शहर संघाने नवयुग व्हाँलीबाँल चषकावर मारली बाजी
(सुयोग झोळ) वाशिंबे प्रतिनिधी
वाशिंबे येथील आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सोलापूर शहर संघाने ४ गुणांनी बाजी मारुन प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून नवयुग चषक पटकावला आहे. मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन यशकल्याणी सेवाभावी संस्था अध्यक्ष गणेश करे पाटील व दिग्विजय बागल यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेमध्ये ३२ संघानी सहभाग घेतला. अंतिम सामना सोलापूर शहर विरुद्ध मूर्टी ता. बारामती यांच्यामध्ये झाला. चुरशीच्या सामन्यामध्ये सोलापूरच्या संघाने ४ गुणांनी विजय मिळवून प्रथम क्रमांक मिळवून नवयुग चषक पटकावला. या संघाला १५००० हजार रुपये रोख रक्कम व चषक देवून गौरवण्यात आले. स्पर्धेतील तृतीय क्रमांक बार्शी शहर संघाने तर चतुर्थ क्रमांक जेजुरी संघाने पटकावला. स्पर्धेचे आयोजन नवयुग स्पोर्ट्स क्लब वाशिंबे यांनी केले होते.

व्हॉलीबॉल स्पर्धेच्या कार्य्रकमास मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, यशकल्यानीचे गणेश करे पाटील, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष प्रशांत सुरसे, चिखलठानचे सरपंच चंद्रकांत सरडे, सोगावचे सरपंच विजय गोडगे, ऊंदरगाव उपसरपंच रेवन्नाथ निकत, अरुण पवार, श्रीकांत साखरे, तानाजी मोहीते, विनोद बाबर, गोयेगाव सरपंच दादा गायकवाड, अक्षय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.