करमाळासोलापूर जिल्हा

माळढोक अभयारण्य भागात खडी क्रशरला परवानगी ; प्रमाणापेक्षा जास्त होतेय वाहतुक

करमाळा समाचार 

सौंदे हद्दीत दहीगाव ते मिरगव्हाण चालू असलेल्या बोगद्यातून निघालेल्या पाषाणातून खडी तयार करून कोर्टी ते आवाटी चालू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी दहा – 12 टायर वाहनांनी प्रमाणापेक्षा जास्त खडी वरून रात्रंदिवस वाहतूक केली जात आहे.

तरी ज्या नियमाने परवानगी दिली आहे त्या एन पी इन्फ्रा कंपनीने नियमभंग केलेला आहे असे दिसून येते. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी याबाबत पंचायत समीती सदस्य दत्तात्रय हरीभाऊ जाधव यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.

एन.पी. इन्फ्रा कंपनी खडी वाहतूक करीत आहे. वास्तविक पाहता भरलेल्या रॉयल्टी पेक्षा पाचपट खडी बेकायदेशीररित्या भरून चोरी केली जात आहे. हा खडी क्रेशर माळढोक अभयारण्यात येत आहे. तरी त्याला परवानगी देता येत नसताना देखील सुद्धा परवानगी दिलेली आहे.

तरी कृपया या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून चालू असलेली बेकायदेशीर क्षमतेपेक्षा जास्त होत असलेली वाहतूक ताबडतोब बंद करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पत्रात केली आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE