कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर पाच तालुक्यात कडक निर्बंध ; सोमवार पासुन नवे निर्बंध
करमाळा समाचार
लोकांचा हलगर्जीपणा व प्रशासनाकडून घेण्यात आलेला ढिलेपणायामुळे करमाळा सह पाच तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण संचारबंदी लागण्याची शक्यता आहे. पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने जिल्हाधिकारी आज आदेश काढू शकतात.

ग्रामीण मध्ये सध्या एकूण 4442 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये पंढरपूर 1055, माळशिरस 799, माढा 773, सांगोला 882 व करमाळा 424 रुग्णांचा समावेश आहे. पाच तालुक्यात तीन हजार 893 रुग्ण आहेत. उर्वरित तालुक्यांमध्ये 549 रुग्ण आहेत. या पाच तालुक्यातील संसर्ग इतर तालुक्यात पसरू नये यासाठी संचार बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पाच तालुक्यांमध्ये संचार बंदी लागू केल्यानंतर अत्यावश्यक सेवा मध्ये सवलती दिल्या जाणार आहेत. दूध, भाजीपाला, किराणा, दुकाने, हॉस्पिटल, पेट्रोल पंप यांना वगळण्यात येऊ शकते. रविवारी रात्री संबंधित आदेश निघण्याची शक्यता.