बारामती येथील कृषी प्रदर्शन पाहून विद्यार्थी गेले भारावून ; यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेद्र पवारांचे मार्गदर्शन
करमाळा समाचार
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे सचिव, विलासराव घुमरे सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील पीकशास्त्र या विषयाची ऑग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट , बारामती यांनी आयोजित केलेले कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. बी.पाटील , उपप्राचार्य संभाजीराव किर्दाक, प्रबंधक कैलास देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले .


या अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांनी कृषीप्रदर्शनातील विविध ठिकाणांना भेटी देऊन माहिती संकलित केली . तेथील भव्य प्रदर्शन पाहून विद्यार्थी भारावून गेले . तसेच ऑग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष श्री राजेंद्र पवार यांचे बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यात शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा दृढ निश्चय केला व महाविद्यालयाच्या परिसरात सुद्धा आधुनिक पद्धतीने शेती विकसित करण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
या कृषीप्रदर्शनातील ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात होणार आहेत. संपूर्ण शैक्षणिक सहल आनंदी वातावरणात पार पडली. तसेच या अभ्यास दौऱ्यात मकाई सहकारी साखर कारखान्याला भेट देऊन साखर उद्योगाची माहिती घेतली . या शैक्षणिक सहलीचे उत्कृष्ट नियोजन प्रा. डॉ. हरिदास बोडके , प्रा.सुर्यवंशी , प्रा. पल्लवी टोणपे, प्रा. सुवर्णा कांबळे , प्रा. त्रिवेणी मोरे , प्रा. अधोरे ए.जे. , प्रा. विजय रोडगे, प्रा.एस.व्ही. व्यवहारे प्रा.शेळके ए.एन. यांच्या अथक परिश्रमातून नियोजन झाले .