करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे यांची बदली ; त्यांच्या जागी पाटील यांची नियुक्ती

करमाळा समाचार

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांची नुकतीच पदोन्नतीसह पिंपरी चिंचवड येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बदली झाली आहे. डॉ. हिरे यांनी आपल्या कारकिर्दीत करमाळा कुर्डूवाडी व टेंभुर्णी या पोलीस ठाण्यांचा कार्यभार पाहत बार्शी येथीलही सात महिन्यांचा कार्यकाल योग्य रीतीने पार पाडला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यातून अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या त्या त्यांनी अगदी योग्य पद्धतीने हाताळण्याची ही दिसून आले आहे. तर आता श्री अजित पाटील करमाळ्याचे नवे अधिकारी असतील.

करमाळा येथे काम करत असताना करमाळा पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये कित्येकदा ताणलेली प्रकरणे हे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्यासमोर गेल्यानंतर मावळली असल्याचे आपण पाहिलेले आहे. कायदा आणि सुव्यवस्था खराब होऊ नये यासाठी हिरे हे स्वतः लक्ष घालत होते. त्यांचा करमाळ्यातील कार्यकाळ फेब्रुवारी २०१९ ते आज तागायत होता.

जनसामान्य, पत्रकार व नेत्यांशी त्यांचे चांगले सलोख्याचे संबंध असल्याने त्यांच्या शब्दाचा मान ही तालुक्यासह त्यांच्या कार्यक्षेत्रात पडत होता. त्यांचा कार्यकाल कोरोना तसेच सरकार बदलानंतर वाढलेला असला तरी जनतेला मात्र डॉ. विशाल हिरे हेच करमाळ्यात असावेत असे वाटत राहिले. त्यामुळे त्यांच्या कार्यकाल वाखाण्याजोगा होता.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE