केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत सातोली साठी भरघोस निधी
करमाळा समाचार
करमाळा: केंद्रात असलेल्या भाजपा सरकारच्या वतीने जि.प.सोलापूर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून सातोली गावाच्या गावांतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी भरघोस असा ८१ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.

सातोली गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी भाजपा चे तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी वेळोवेळी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सचीन कल्याणशेट्टी, जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, वरिष्ठ नेते व अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या योजनेस मंजुरी मिळाली आहे. या योजनेमुळे सातोली गावातील प्रत्येक घरो घरी नळाचे कनेक्शन उपलब्ध होणारआहे. सर्व ग्रामस्थांना याचा लाभ होईल असेही श्री साळुंके म्हणाले.

भाजपा सरकारच्या काळात सातोली गावासाठी आलेला हा सर्वात जास्त निधी आहे. यापुढे देखील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे विवीध विकास कामे केली जातील असेही अमरजित साळुंके यांनी सांगितले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य व सातोली ग्रामस्थ यांनी सरकारचे आभार मानले.