अचानक आलेल्या पावसाने मोठ्याप्रमाणावर पीकासह शेतमालाचे नुकसान ; नुकसान भरपाईची मागणी
जिंती प्रतिनिधी – दिलिप दंगाणे
रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे शेतीमालाचे व पीकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. जिंती परिसरातील गहू , कांदा, मका पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. गव्हाचे पीक काढणीला आलेले पूर्ण वाया गेले आहे.


अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. गेल्या दोन दिवसापासून मेघगर्जनेसह वादळी वारे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे काढणीला आलेल्या गहू, कांदा, मका तसेच कांद्याचे गोट इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे पिके भुईसपाट झालेली आहेत. तरी सरकारने शेतकऱ्यांचे दुःखाचे असू पुसण्यासाठी त्वरित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात द्यावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
जिंती, कात्रज, खातगाव, को. चिंचोली, कावळवाडी, रामवाडी, भिलरवाडी, भगतवाडी, पोमलवाडी, निमतवाडी, देलवडी यासह संपूर्ण पश्चिम भागाला मोठयाप्रमाणावर नुकसानाचा सामना करावा लागला आहे.
माझी दोन एकर मका व काढणीला आलेला एक एकर गव्हाचे वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. तरी शासनाने पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत. – –
– सुकुमार रायचंद दोभाडा
शेतकरी जिंती