मराठा समाजाच्या आंदोलनाला नाभीक समाजाचा पाठिंबा
करमाळा समाचार
करमाळ्यात सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला आज नाभिक समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष नारायण पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

करमाळा येथे तहसील परिसरात मागील सहा दिवसांपासून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. यामध्ये वेगवेगळ्या गावातून व वेगवेगळ्या गटातटातील सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन पाठिंबा देत आहेत. त्यातच आता नाभिक समाजाच्या श्री संत सेना महाराज नाभिक समाज उन्नती संस्था या संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.

या निवेदनावर अध्यक्ष नारायण पवार, राजेंद्र जगताप, योगेश दुधाट, जयंत दळवी, दळवी व कोकाटे आदींच्या सह्या आहेत.