वीट येथे एकाचा संशयास्पद मृत्यु ; खुन असल्याचा प्राथमिक अंदाज
करमाळा समाचार

एकीकडे करमाळा शहरात मतदान प्रक्रिया सुरू असताना वीट येथील एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या ठिकाणी करमाळा पोलीस दाखल झाले असून संशयताला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयास्पद मृत्यू झालेल्या व्यक्तीचे कचरु ( मामासाहेब ) विश्वनाथ खंडागळे नाव असून त्यांचे वय 52 आहे.

करमाळा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहोचले तर मृत्यू कशाने झाला आहे याचा शोध घेतला जात आहे. प्रथमदर्शनी सदरचा खून असल्याच्या चर्चा असल्याचे दिसून येत आहे. वीट गावातील कचरू खंडागळे हे संशयास्पद रित्या मयत झाल्याचे दिसून आले कोणत्याही प्रकारचे व्रण शरीरावर नसून मारहाण झाल्याचेही दिसून येत नाही.
पण अचानक झालेल्या मृत्यूमुळे संशय वाढला त्यातच संबंधिताचा गुदमरून किंवा गळा दाबून खून झालेला असावा असा दाट संशय व्यक्त केला जात होता. त्यावरून करमाळा पोलिसांना त्या ठिकाणी बोलवण्यात आले त्यावरून पोलिसांनी प्राथमिक माहिती घेऊन संशयताला ताब्यात घेतले आहे. तर पुढील प्रक्रिया सुरू असून लवकरच घटनेची सखोल माहिती पोलीस शोधून काढतील असे दिसून येत आहे.


