ध्वजसहिंतेचा अवमान होणार नाही याची काळजी घ्या – तहसिलदार समीर माने ; काय करा आणी काय नको मार्गदर्शक सुचना
करमाळा समाचार –
केंद्र व राज्य शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार दि 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. या कालावधीत प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या घरावर आस्थापनेवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंपूर्ण करत असताना विविध नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ध्वजाचा अवमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

- हे करावे…
- राष्ट्रध्वज हाताने घातलेला विणलेला किंवा मशीनद्वारे तयार केलेला सूत, पॉलिस्टर , लोकर, सिल्क, खादी पासुन तयार केलेला असावा.
- राष्ट्रध्वजाचा आकार 3:2 याप्रमाणे असावा.
- राष्ट्रध्वजाचा केसरी रंग वरच्या बाजूने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजूने राहील याप्रमाणे फडकवावा स्तंभाच्या वरच्या टोकावर राष्ट्रध्वज लावावा.
- राष्ट्रध्वज उतरवताना सावधानतीने व सन्मानाने उतरावा.
- राष्ट्रध्वज उतरवल्यानंतर व्यवस्थित व सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
- कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही याची काळजी घ्यावी.
- राष्ट्रध्वज दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या काळात रात्री राष्ट्रध्वज खाली उतरवायची आवश्यकता नाही.

- हे करु नये …
प्लास्टिक किंवा कागदी झेंडा वापरू नये. - कोणतेही सजावटी वस्तू लावू नयेत. तसेच राष्ट्रध्वज फडकतेवेळी फुलांच्या पाकळ्या ठेवण्यात येऊ नये.
- राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह काढू नये.
- राष्ट्रध्वज फाटलेला मळलेला अथवा चळवळलेला लावण्यात येऊ नये.
- एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये.
- राष्ट्रध्वजापेक्षा इतर कोणत्याही ध्वज उंच लावू नये.
- तोरण किंवा अथवा पताका म्हणून अन्य कोणत्याही प्रकारचे शोभेसाठी उपयोग करू नये अशा मार्गदर्शक सूचना तहसील कार्यालय यांच्यावतीने देण्यात आल्या आहे.