तहसीलदार विजय शिवाजी तळेकर यांच्यावतीने शाळेला दोन कॉम्पुटर संच भेट
करमाळा समाचार
आज करमाळा तालुक्यातील केम गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केम या ठिकाणी कै. शिवाजी (बापू ) जनार्दन तळेकर यांच्या स्मरणार्थ केम गावचे सुपुत्र पनवेलचे तहसीलदार विजय शिवाजी तळेकर साहेब यांनी दोन कॉम्पुटर संच यांचे बंधू महेश शिवाजी तळेकर यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देण्यात आला.

अनेक वर्षापासून अशा सामाजिक उपक्रमामध्ये व केम गावातील व करमाळा तालुक्यातील इतर गावांमध्ये माननीय विजय तळेकर तहसीलदार साहेब यांनी प्रत्येक वेळी प्रत्येक गोरगरीब लोकांना प्रत्येक वेळी मदत केली आहे कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्य असो व कोणत्याही लोकांना संकटी वेळी कायमस्वरूपी उभे राहणारे असे तहसीलदार विजय तळेकर साहेब व त्यांचे बंधू यांना कधीही मेसेज मिळाला तरी स्वतःहून उभे राहतात.

कधीही त्यांनी स्वतःची जबाबदारी ग्रामीण भागामध्ये मदत करण्याची उमिद ठेवली आहे. शहरांमध्ये जाऊन देखील ग्रामीण भागाची जाण असणारे एकमेव नेतृत्व असणारे तहसीलदार साहेब व त्यांचे सर्व बंधू व घरातील मेंबर कायमस्वरूपी कधीही प्रत्येकाच्या सुखा दुःखामध्ये जाणीव असणारे असे केम गावचे सुपुत्र म्हणून त्यांची ओळख ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्या व महाराष्ट्र मध्ये झाली आहे.
कोरोना काळात देखील करमाळा तालुक्यातील केम व ग्रामीण भागामध्ये एक हजार अन्नधान्य किटाचे वाटप यांच्यामार्फत करण्यात आले होते. व 500 लिटर सॅनिटायझर केम गावमध्ये ग्रामीण भागात दिले होते. कोल्हापूर भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे लोकांची घरे पाण्यात गेली होते त्यावेळी अर्ध्या रात्री सर्वप्रथम मदत घेऊन जाणारे एकमेव तहसीलदार हे विजय तळेकर साहेब हे होते.संबंधित प्रशासकीय कार्यकाळ मध्येही त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत.
त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, महसूल प्रशासनाकडून व अनेक मंत्र्याकडून त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार मिळाले आहेत .असे व्यक्तिमत्व असणाऱ्या साहेबांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी घडावा व पुढील वाटचालीसाठी व शिक्षणासाठी त्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्यांना मदत व्हावी म्हणून ते कायमस्वरूपी कार्यबद्ध व सक्षम असतात कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत पाहिजे असेल तरी मनमोकळेपणाने मदत करणारे व दानत असणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणून केम गावामध्ये नावलौकिक असणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
केम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कॉम्प्युटर संच भेट दिले त्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमा वेळी उपस्थितत्यावेळी ए पी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अच्युत काका पाटील, पै, महावीर आबा तळेकर,प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर, युवा नेते दादासाहेब पारखे भाजप तालुका उपसरचिटणीस धनंजय ताकमोगे, जिल्हा परिषद शाळा केम व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय सोलापुरे उपाध्यक्ष सचिन रणशिंगारे, समाजसेवक संतोष रायचूरे, शाळेचे शिक्षक तळेकर गुरुजी वासकर गुरुजी व इतर महिला शिक्षक वर्ग व विद्यार्थी पालक