टेंभुर्णी बनावट नोटा प्रकरण; करमाळा तालुक्यातल्या मास्टरमाईंड ने रचला प्लॅन
प्रतिनिधी- (करमाळा समाचार)
टेंभुर्णी (ता. माढा) येथील एकास ६४ लाख रुपयांच्या बनावट नोटा व ते बनवण्यासाठी लागणारे तीन लाखांचे साहित्य राहुरी आणि टेंभुर्णी पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकणात त्यांचे दोन साथीदारांनाही अटक केली. यावेळी करमाळा तालुक्यातील अर्जुननगरचा पप्पु त्यांच्या हाती लागला आहे. यापुर्वीही बनावट नोटा खपवताना त्याला कुर्डुवाडी पोलिसांनी २०२२ मध्ये त्याला बेड्या ठोकल्या होत्या. मागील आठ महिन्यांपूर्वी २२ महिन्यांनंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.

कंदरमध्ये नोकर भरतीसह विविध प्रकारचे ऑनलाइन अर्ज भरताना प्रिंटरमधून ५०० रुपयांच्या नोटेसारखी हुबेहूब कलर प्रिंट येत असल्याचे पाहुन पप्पुला कल्पना सुचली. आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (वय ३३, रा. अर्जुननगर, ता. करमाळा) याने टेंभुर्णी (ता. माढा) येथील शीतलनगरमधील समाधान गुरव यांच्याकडे एमआयडीसीत एका कंपनीत कामाला आहे, असे सांगून भाड्याने खोली घेतली.
त्यात छपाई मशीन, इतर खोल्यांमध्ये संगणक, प्रिंटर, स्कॅनर, कटिंग मशीन, शाई, कागदाचे बंडल आणून बनावट नोटा छपाई सुरू केली. यातूनच बनावट नोटा छापून या चलनात आणून पैसा कमावणे सुरू झाले. पुन्हा नव्याने राजेंद्र कोंडिबा चौघुले (रा. पाटेगाव, ता. कर्जत), तात्या विश्वनाथ हजारे (रा. पाटेगाव, ता.

अशी झाली अटक …
पप्पुने कर्जत, जि. अहिल्यानगर येथील दोघांना बरोबर घेऊन तो या बनावट नोटा दुचाकीवरून दोन साथीदारांना घेऊन राहुरी येथे शनिवारी बनावट नोटा चलनात आणण्यासाठी दोन लाखांच्या बनावट नोटा देण्यासाठी एक लाख रुपयाची रक्कम घेणार असल्याची माहिती राहुरी पोलिसांना मिळाल्याने त्यांनी सापळा रचून तिघा आरोपींना रविवारी अटक केली.