करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा नगरपरिषद वर हलगी मोर्चा ; कर्मचारी व आंदोलकात शाब्दिक चकमक

करमाळा :-


करमाळा शहर विकास आघाडीचा आज शहरातील करदाते यांना मुलभुत सुविधा मिळाव्यात व इतर आदी मागण्यासाठी करमाळा नगरपरिषदेवर भव्य हलगी मोर्चा काढण्यात आलाअसून सदर हलगी मोर्चा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन मोर्चास सुरुवात करण्यात आली सदर मोर्चा फुलसौदर चौक, जयमहाराष्टू चौक भवानी पेठ दत्त पेठ सुभाष चौक राशीन पेठ पुणे रोड मार्गे नगरपालिका कार्यालय येथे आला.

यामध्ये करमाळा शहरातील सर्व नागरिकांनी सहभाग घेतला.
यावेळी मोर्चा मधील नागरीकांसमोर बोलताना शहरविकास आघाडीचे गटनेते सुनील बापु सावंत म्हणाले की, करमाळा नगरपरिषदेवर प्रशासक आल्यानंतर करमाळा शहरातील पाणी पुरवठा विष्कळीत झाला असुन काही ठिकाणी नळाला गटारीचे पाणी येत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे तर आरोग्य विभागातील साफसफाई करणारे ठेकेदाराचा मनमानी कारभार चालु असुन शहरातील गटारी तुडुंब भरलेल्या असुन शहरात अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसत आहे.

नगरपालिकेचे या अत्यावश्यक सेवेकडे लक्ष नाही. तसेच शहरातील गोरगरीब नागरिक अनेक वर्षापासुन अतिक्रमण घरात रहात असुन त्यांची घरे शासनाच्या नियमानुसार नियमित करण्यात यावी. त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा. शहरातील विकास कामे ठप्प झाली असुन नगरपालिका चे कनिष्ठ अभियंता आठवड्यातुन दोन दिवस कामावर हजर असतात. त्यामुळे शहर विकास कामावर परिणाम होत आहे. पावसाळ्यापुर्वी नाले, साफसफाई चे कामास सुरवात झाली पाहीजे. परंतु काही दुर्घटना घडली तर प्रशासनास जाग येते, शहरातील मुस्लिम दफन भुमी (नासीर जंग ) सुशोभित करण्यासाठी अल्पसंख्यक निधी ख़र्च केला जात नाही, दलीत वस्तीसाठी आलेला निधी दलित वस्तीतच ख़र्च करावा अश्या अनेक मुलभुत सुविधा मिळाव्यात अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सावंत यांनी सांगीतले.

सदर शहर विकास आघाडीचा हलगी मोर्चा नगरपरिषदे कडे आल्यानंतर मोर्चा मधील नागरीक व नगरपालिका चे कर्मचारी मध्ये शाब्दिक बाचा बाची झाली. परंतु पोलीस उपनिरीक्षक कुंजीर साहेब यांनी मद्यस्थी केल्यानंतर नागरिक शांत झाले व पुढील अर्नथ टळला.

यावेळी गोवर्धन चवरे पाटील ,विवेक येवले,देवा लोंढे आदीची भाषणे झाली यावेळी करमाळा नगरपरिषदेचे करवसुली अधिकारी बदे यांनी निवेदन स्वीकारले असुन यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय शिंदे यांनी पाठींबा दिला. तसेच मदारी समाजाचे नेते उमर मदारी यांनी पाठींबा दिला. यावेळी माजी नगरसेवक संजय सावंत, फारुक जमादार, रविन्द्र कांबळे, मनोज गोडसे, विजय सुपेकर, गोविंद किरवे, नागेश उबाळे , संभाजी गायकवाड़ गणेश झोळे, शिवाजी विर अशोक ढवळे वाजीद शेख बापू उबाळे, खलिल मुलाणी, मनोज राखुंडे, हाजी फारुक बेग, पांडुरंग सावंत, गणेश अडसुळ, अशोक मोरे, विकास उबाळे, विकास घोलप, किरण उबाळे, दिपक सुपेकर, शब्बीर शेख, उमर मदारी, बुवासाहेब धनवे, विकास पवार, पांडुरंग पवार, दादासाहेब इंदलकर, बापू उबाळे, संतोष बनकर, तौफीक शेख, सादीक बेग, हाजी फारुक बेग, रवी जाधव, ज़मीर पठान, आसिफ कुरेशी, विजय सुपेकर, नितिन ओभासे, सिंकदर सय्यद, राजु वीर आदी जण उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कुंजीर साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE