बोगस नोटरी करुन फसवणुक केल्या प्रकरणी संशयीतांना तात्पुरता दिलासा
समाचार टीम
बोगस नोटरी दस्त करून महिला डॉक्टरांची जागाविकत घेतल्याचे सांगुन फसवणूक केल्या प्रकरणी करमाळ्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील संशयीतांनी अटकपुर्व जामीनाचा अर्ज बार्शी न्यायालयात केल्यानंतर तिघांचाही जामीन फेटाळला होता. पण त्यांनी पुढे उच्च न्यायालयात दाद मागितली येथील न्यायालयाने तिघांचाही तात्पुरता अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे. यामध्ये सोहेल अब्बास शेख यासह तीघांचा समावेश आहे.

डॉ. वैशाली पंकज शहा या सध्या चाकण ता. खेड जिल्हा पुणे येथे त्यांचे सासरी राहण्यास आहे. त्यांचे चाकण येथेच क्लिनिक आहे. डॉ. शहा यांचे माहेर करमाळा आहे. इथे त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. डॉ. शहा यांचे वडील प्रकाश मेहता हे दिनांक १९९५ रोजी मयत झालेले आहेत. तसेच त्यांची आई सरोजिनी मेहता २०१६ रोजी मयत झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील २७१२/ब या जागेवर डॉ. शहा यांची वारस म्हणून नोंद लागलेली आहे.

सदरची जागा ही दत्तपेठ करमाळा येथील मोक्याचे ठिकाणी असल्याने यातील संशयीत सोहेल अब्बास शेख डॉ. शहा या करमाळा येथे राहत नसल्याचा फायदा घेऊन बोगस नोटरी दस्त बनवला व सदर दस्तावर मुन्ना पत्तू शेख व तुषार मधुकर शिंदे यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या व यातील रक्कम रुपये दहा लाख रुपये दिल्याचे दाखवून साठेखत केल्याचे बोगस दस्त तयार केला अशी तक्रार डॉ. शहा यांनी केली होती.
याप्रकरणी संशयीत आरोपींनी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीन साठी धाव घेतली होती पण त्यावेळी नामंजुर करण्यात आली होती. यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडे दाद मागितली. यावेळी न्यायालयाने तिघांना अंतरीम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात फिर्यादी डॉक्टर ने 7 जून 2022 रोजी तीन संशयित आरोपी विरोधात करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने त्या सदर गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना अंतरीम अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे. संशयीताकडुन ॲड अनिकेत उज्वल निकम ,भाग्यश्री अमर शिंगाडे-मांगले व अमर अंगद शिंगाडे यांनी काम पाहिले.