केम च्या विद्यार्थीनेचे कौतुकास्पद काम ; जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक
करमाळा समाचार
केम – श्री उत्तरेश्वर ज्यु. कॉलेज केम येथील कु. लक्ष्मी देवकर या विद्यार्थिनीने महाराष्ट्र शासन अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) आयोजित जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. त्यानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. यात सोलापूर जिल्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला होता. यामध्ये ग्रामीण भागातील उत्तरेश्वर ज्यु. कॉलेज मधील कु. लक्ष्मी देवकर हिने आपल्या गुणवत्तेवर शहरी भागातील विद्यार्थ्यांवर मात करीत यश संपादन केले. यासाठी तिला प्रा. मालोजी पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

कु. लक्ष्मी देवकर हिला प्रा. गोपीनाथ शिंदे, प्रा. डॉ. मच्छिन्द्र नागरे, प्रा. संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. अमोल तळेकर यांनी सहकार्य केले. तिच्या या यशाबद्दल मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख, प्राचार्य श्री विष्णू कदम , मा. आजीव सेवक श्री. डी. व्ही. पाटील, शालेय समिती अध्यक्ष श्री मोहनआबा दोंड, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील मुली योग्य मार्गदर्शन लाभल्यावर निश्चितच आपल्या गुणवत्तेवर आणि इच्छा शक्तीवर यश संपादन करतात हे लक्ष्मी देवकर हिच्या यशामुळे सिद्ध झाले आहे.यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.