बुधवारी ओढ्यात वाहुन गेलेल्या व्यक्तीचे मृत शरीर अखेर सापडले ; दोन दिवस सुरु होता शोध
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामध्ये शहरात सर्वत्र पाणी आले. शहरातील कुंभारवाडा भागातील ओढ्यांतुन पाणी जोरदार वाहत होते. त्यादरम्यान येथील ओढ्यावरुन जात असताना एका ५८ वर्षीय व्यक्तीचा पाय घसरून तो ओढ्यात पडला. त्यावेळी तो वाहत जाताना काही युवकांना दिसून आला. दोन दिवसाच्या शोधानंतर स्मशानभूमीच्या शेजारील ओढ्यात ते मिळुन आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सूर्यकांत मंडलिक रा. साठेनगर असे त्या व्यक्तीचे नाव असल्याचे समजते आहे. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास सुर्यकांत मंडलीक हे सुमंतनगर येथे बहिणीकडील घरी गेले होते. माघारी येत असताना ओढ्याच्या डाव्या बाजुने येत असताना ते पाण्यात पडले नंतर पुलाखालुन पाईप मधुन ते दुसऱ्या बाजुने बाहेर पडले त्यावेळी युवकांनी पाहिले. संबंधित प्रत्यक्षदर्शीनी ही घटना कळवली. त्यानंतर शोध सुरु झाला होता.
जाहीरात ..

https://forms.gle/WJUFakxnUCH8c5T38https://forms.gle/WJUFakxnUCH8c5T38
*आजच आपल्या मुलीचा प्रवेश निश्चित करा !!*
*प्रवेशासाठी सोबत दिलेल्या लिंक वरील फॉर्म भरून सबमिट करावा*
गुरुवारी सकाळी पासुन शोध सुरु केला पण उशीरा पर्यत मिळुन आले नाही. नंतर साठे नगर येथील युवकांनी मोर्चा संभाळला व पाण्या उतरुन शोध सुरु केला. यावेळी आर पी आय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नागेश कांबळे, युवराज जगताप, शरद पवार यांच्यासह सर्व युवक पाण्यात उतरले पण तरीही रात्री उशीरापर्यत काहीच मिळुन आले नव्हते पण दोन दिवसांच्या शोधा नंतर संबंधित मृत शरीर शुक्रवारी दुपारी बारा बाजता स्मशानभूमी शेजारील ओढ्यात मिळुन आले आहे.