करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

उपजिल्हा रुग्णालयात कोरोना काळातही सीझर विभाग सुरुच ; २३ प्रसूतीनिमित्त डॉक्टरांचा सत्कार

प्रतिनिधी – करमाळा समाचार 


करमाळा मतदार संघाचे आमदार मा. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे जून २०२० पासून सीझर शस्त्रक्रिया विभाग सुरू झाला आहे. आजतागायत या उपजिल्हा रुग्णालयांमधून 23 सीझर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आज आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते संबंधित डॉक्टर व अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.


विशेषतः परांडा तालुक्यातून आवर्जून येणारे भूलरोग तज्ञ डॉ. सत्यनारायण गायकवाड , स्त्रीरोग तज्ञ डॉ.निलेश मोटे , वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे , वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. यावेळी सी आर्म मशिन उपलब्ध करुन हाडांची मोफत ऑपरेशन चालु करणे , महात्मा जोतिबा फुले योजना काॅटेज हाॅस्पिटलला मंजुर असुन त्याचे उद्घाटन लवकरात लवकर करणे , ब्लड स्टोरेज युनिट चालु करण्यासाठीची आवश्यक ती कार्यवाही करणे , ग्रामीण रुग्णालय जेऊर या रुग्णालयासाठी पदभरती करुन ते रुग्णालय कार्यान्वित करणे इत्यादी विषयावर चर्चा झाली.

स्त्रीरोग तज्ञ , भूलतज्ञ तसेच वैद्यकीय अधीक्षक यांच्या प्रयत्नांमुळेच या उपजिल्हा रुग्णालयात सीझर शस्त्रक्रिया यशस्वीपणे होत आहेत याबद्दल आ. संजयमामा शिंदे यांनी स्टाफ चे कौतुक केले. या सीझर शस्त्रक्रियेचा लाभ तालुक्यातील गोरगरीब जनतेने घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE