करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विकास आघाडीच्या गर्दीने वाढवली निवडणूकीची धार ; विजयासाठी करावे लागेल सावंतांना पार

करमाळा समाचार

 

करमाळा नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदाच एवढ्या चुरशीची होऊन बसली आहे. कायम दुरंगी होणाऱ्या लढतीत यंदा मात्र तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. यापूर्वीही तिरंगी लढत व्हायच्या पण दोन गटातच मोठी लढत बघायला मिळायची. पण यंदाच्या निवडणुकीत सावंत गट ताकतीने मैदानात उभा राहिल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. तर सावंत गटाने शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ताकद दाखवल्याने विजयाच्या घौडदौड मध्ये ते आघाडीवर आहेत. इतर दोघांपैकी एकाला त्यांचा पराभव करूनच विजय मिळवावा लागेल हे दिसून येत आहे.

शहर विकास आघाडी यापूर्वीही मैदानात होती. पण त्यामध्ये सावंत गटासह कन्हैयालाल देवी, संजयमामा शिंदे यांच्या गटांचाही सहभाग होता. यंदा मात्र देवी व संजयमामा गट सोबत नसतानाही सावंत यांनी शहरातील इतर छोटे मोठे गट सोबत घेऊन शहर विकास आघाडीची निर्मिती केली व नाराज गट त्यांना जुडत गेले. यामुळे आज तुल्यबळ गटाच्या यादीत सावंत असल्याने पहिल्या दोन क्रमांकामध्ये सावंत यांचे नाव येऊ लागले आहे. ज्याला कोणाला विजय मिळवायचा असेल त्याने सावंत गटाचा पराभव करूनच त्याला पुढे जावे लागेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सुरवातीपासुन चर्चेत असलेले शिवसेनेचे (शिंदे गट) जगताप तोच क्रमांक राखुन ठेवतील का ? भाजपाचे देवी पुढे जातील हे दिसुन येईल. पण पहिल्या दोन मध्ये सावंत असतील असे चित्र सध्या दिसत आहे.

मागील निवडणुकीची आकडेवारी पाहता जगताप व बागल एकत्र असताना ६१५२ मते मिळवण्यात त्यांना यश आले होते. तर नागरिक संघटना, सावंत गट व संजयमामा शिंदे गट त्यामध्ये विलासराव घुमरे सरांचा समावेश होता. त्यावेळी त्यांना ५३६३ मते मिळाली होती. तरी यंदाच्या निवडणुकीत जगताप व बागल हे वेगवेगळे लढताना दिसत आहेत. तर देवी व सावंत हेही वेगळे झाले आहेत. त्यामुळे यातील मतांची विभागणी होणे अटळ आहे. तर जगताप – बागल वेगळे होऊन देवी यांच्या बाजूने भाजपासह बागल उभा आहेत. तर संजयमामा शिंदे गटाचाही देवी यांना पाठिंबा आहे, याशिवाय विलासरावजी घुमरे सर व भाजपा सोबत आहे. मागील वेळी गणेश चिवटे व भाजपाला २३३८ मते मिळाली होती.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE