जिल्ह्यात 86 ऑक्सिजन बेड तर 5 वेन्टीलेटर बेड शिल्लक ; दि 11 मे रोजीची आकडेवारी
करमाळा समाचार
जिल्ह्यातील रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याने ऑक्सीजन बेड तसेच व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होऊ लागले आहेत. तसेच प्रशासनाने ही अधिकची बेड व्यवस्था केल्याने सध्या संपूर्ण जिल्ह्यात 86 ऑक्सीजन बेड तर पाच व्हेंटिलेटर बेड शिल्लक असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. ही आकडेवारी दिनांक 11 रोजी ची असून उद्यापर्यंत ही आकडेवारी बदलू शकते. तरी वेळेत संबंधित हॉस्पिटलची संपर्क साधावा. करमाळा समाचार टीम ने कडुन जमेल तेवढी माहीती देण्याचा प्रयत्न आहे.
ऑक्सीजन बेड शिल्लक असलेले दवाखाने व शिल्लक बेडची माहिती पुढील प्रमाणे…
शहा हॉस्पिटल बार्शी 2,
नकाते मंगल कार्यालय बार्शी 10,
उपजिल्हा रुग्णालय करमाळा 1,
रुरल हॉस्पिटल माढा 1,
साखरे हॉस्पिटल कुर्डूवाडी 4,
करमाळा समाचार अपडेट
जयश्री नर्सिंग होम टेंभुर्णी 4,
यशश्री हॉस्पिटल टेंभुर्णी 8,
अश्विनी हॉस्पिटल टेंभुर्णी 6,
अश्विनी हॉस्पिटल अकलूज 10,
गुजर हॉस्पिटल अकलूज 8,
श्रेयस हॉस्पिटल श्रीपुर 1,
संमती हॉस्पिटल अकलूज 1,
अश्विनी हॉस्पिटल नातेपुते 4,
अकलाई हॉस्पिटल अकलूज 1,
अभय क्लिनिक अकलुज 2,
संजीवनी हॉस्पिटल मोहोळ 5,
गावडे क्लिनिक मोहोळ 8,
सेंट लूक हॉस्पिटल उत्तर सोलापूर 6,
दक्षिण सोलापूर चौधरी चिल्ड्रन हॉस्पिटल बसव नगर 4
असे एकूण 1671 ऑक्सीजन बेड पैकी 1585 बेड गेले आहेत. तर 86 बेड शिल्लक असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले आहे.
वेन्टीलेटर बेड बाबत माहीती..
तर जिल्ह्यात एकूण 262 वेन्टीलेटर बेड पैकी 257 बेड व्यस्त आहेत. तर साखरे हॉस्पिटल कुर्डूवाडी 1, दक्षिण सोलापूर येथील अश्विनी रुलर मेडिकल कॉलेज 4 असे एकूण पाच व्हेंटिलेटर बीड शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. तरी गरजूंनी संबंधित ठिकाणी चौकशी करण्याचे आव्हान करण्यात येत आहे. तरी ही आकडेवारी आजच्या दिवसापुरती मर्यादित असून उद्या ची आकडेवारी उद्या जाहीर केली जाईल.