पोलिसांची कार्यतत्परता आणी गरीबाची श्रीमंती ; परांड्याच्या व्यापाऱ्याचे हरवले दोन लाख मिळाले माघारी
करमाळा समाचार
आज दुपारी एकच्या सुमारास प्रवास करत असताना व्यापाऱ्याची दोन लाख रुपये असलेली बॅग हरवली होती व्यापारी हवालदिल झाला व त्याने थेट पोलिस स्टेशन गाठले या वेळी पोलिसांनी कसलेही वेळ न दडवता वेगात तपासाला सुरुवात केली तपास करत असताना एका गरीब दूध वाल्याला सदरची बॅग मिळून आली असल्याची माहिती समोर आली त्यानेही संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता कसलीही वेळ न दडवता बागेचा शोध घेणाऱ्या पोलिसांना याबाबत कल्पना देत सर्वच्या सर्व रक्कम त्याने परत पोलिसांच्या स्वाधीन केले यामुळे प्रशासनाची कार्यतत्परता व गरिबातील श्रीमंतीचा प्रत्येक एकाच वेळी बघायला मिळाला.
*मनोहर भोसले यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे मेडिकल चेकअप करून करमाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे*
सध्याच्या काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बंद घरे असतील किंवा माणूस घराबाहेर पडताना अतिशय जपून वागत आहे. तेव्हा कधीही कुठून चोरी होईल किंवा धोका होईल अशी शक्यता असलेल्या आजच्या युगात अशा पद्धतीचा अनुभवही कधीतरीच बघायला मिळतो. यामध्ये पोलिसांची ही तितकेच कौतुक व्हायला हवे याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला एवढी तातडीची सेवा दिल्यामुळेच आज सदरची बॅग सहजरीत्या मिळून आली आहे.
*मोठ्या कारणामुळे आजही आ. रोहित पवारांचा अदिनाथशी संबंध नाही ; यंदाही कारखाना बंदच*
मोठ्या कारणामुळे आजही आ. रोहित पवारांचा अदिनाथशी संबंध नाही ; यंदाही कारखाना बंदच
राजेश नारायण तालापल्ली रा परांडा जिल्हा उस्मानाबाद यांचे हरवलेले दोन लाख रुपये पोलिसांच्या तत्परतेमुळे परत मिळाले. तालापल्ली यांची बॅग हरवली तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली. तेव्हा करमाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी आय कोकणे साहेब यांच्या आदेशाने तात्काळ करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल देवकर पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल काझी, पो कॉ सोमनाथ जगताप, पो कॉ गणेश खोटे यांनी तात्काळ तपास केला असता सुनील रामचंद्र मारडकर रा. फंड गल्ली करमाळा यांनी पैसे सापडले असल्याचे सांगितले.
तालापल्ली यांनी त्यापैकी मधील दहा हजार रुपये मारडकर यांना बक्षीस म्हणून दिले.