सरकारने सोमवारी कांद्यावरील निर्यातबंदी उठवली
करमाळा समाचार
मोदी सरकारने सोमवारी कांद्यावरील निर्यातबंदी उठवली. तो निर्णय नव्या वर्षापासून (1 जानेवारी) लागू होणार आहे. काही महिन्यांपूर्वी कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे सरकारने सप्टेंबरमध्ये दर आटोक्यात ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली.

त्याचबरोबर आयातीवरील निर्बंध शिथिल केले होते. आता नवा कांदा बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कांद्याचे दर आटोक्यात आले आहेत. त्यामुळे तात्काळ प्रभावाने कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय परकी व्यापार महासंचालनालयाने घेतला.
