करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात शुक्रवारी निकाली कुस्त्यांचे भव्य मैदान…

प्रतिनिधी – संजय साखरे


करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक 15 मार्च रोजी करमाळा येथे सोलापूर जिल्हा्यातील सर्वात मोठे असे निकाली कुस्त्यांचे भव्य मैदान भरविण्यात येणार असून या मैदानामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल हजेरी लावणार असल्याची माहिती महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहास निमगिरे यांनी दिली.आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत् चंद्रहास निमगिरे बोलत होते .

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, करमाळा येथील देशभक्त नामदेवरावजी जगताप क्रीडा संकुल येथे प्रथमच असे मैदान भरवण्यात येणार असून महाराष्ट्रातील नामवंत मैदानांच्या धरतीवर हे मैदान भरवण्यात येणार आहे.त्याचे स्वरूप हे वारणा, पलूस व कुंडल च्या मैदानासारखे असणार आहे. या मैदानात जवळपास 600 ते 700 कुस्त्या लागणार असून या सर्व कुस्त्या निकाली होणार आहेत .यासाठी प्रथम बक्षीस चांदीची गदा आणि 5 लाख रुपये असणार आहे. या भव्य अशा कुस्ती मैदानाचा सर्व कुस्तीपटूनी व कुस्तीप्रेमिनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

या पत्रकार परिषदेला सुजित बागल, डॉ राहुल कोळेकर,विलास दादा पाटील, चंद्रहास निमगिरे, सुनील बापू सावंत, दादा इंदुलकर ,भारत वस्ताद, पिंटू सरपंच, सुरेश शिंदे ,देवा कोळेकर, अमोल गायकवाड, दादा जाधव, अमोल लावंड, गणेश साळवे ,प्रवीण हिरगुडे, राजेंद्र बिडवे, उमेश काका इंगळे, गजेंद्र कोळेकर, जितेश कांबळे ,इकबाल इनामदार, भाऊसाहेब खरात, अक्षय पिसरे, लालासाहेब काळे उपस्थित होते.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE