करमाळासोलापूर जिल्हा

घरगुती व शेती पंपाच्या कोटेशन चे सवलतीच्या दरात वाटप ; वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन

करमाळा समाचार – संजय साखरे 

ग्रामीण भागातील घरगुती शेती ,व्यावसायिक, औद्योगिक व कृषी ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांसाठी सरकारने जाहीर केलेल्या महावितरण कृषी योजना 2021 या योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी करमाळा महावितरण तर्फे राजुरी येथील नागरिकांसाठी महावितरण कंपनीने आज वीज ग्राहक मेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी घरगुती व शेती पंपाच्या कोटेशन चे सवलतीच्या दरात वाटप करण्यात आले.

यावेळी पारेवाडी वीज उपकेंद्राचे सेक्शन ऑफिसर शिंदे साहेब यांनी लोकांना महावितरण कृषी योजना 2021 या योजनेची सविस्तर माहिती दिली. सध्या केंद्र सरकारने विजेच्या खाजगीकरणाचे धोरण अवलंबले असून जर वीज मंडळाचे खाजगीकरण झाले तर सवलतीच्या दरातील ही योजना लागू होणार नाही. म्हणून महावितरण कंपनीने शेतीपंपासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या 50 ते 65 टक्के सवलतीचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आपले वीज बिल भरून घ्यावे असे आव्हानही ही त्यांनी केले.

राजुरी त उपकेंद्रासाठी आवश्यक असणारे कोटेशन क्षमता पूर्ण झाली तर राजुरी साठी स्वतंत्र वीज उपकेंद्र निर्मितीसाठी आपण प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले. यावेळी राजुरी येथील शेतकऱ्यांना कोटेशन चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रामसेवक श्री रामेश्वर गलांडे यांनी केले. यावेळी सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे, श्रीकांत साखरे ,माजी सरपंच संजय सारंग कर,अजय साखरे, नवनाथ दूरंडे,मुरलीधर जगताप,सचिन जाधव यांच्यासह गावातील कृषी पंप धारक शेतकरी व महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE